इतिहासात एक राजा होता मिडास नावाचा, त्याने हात लावला की सगळ्याचे सोने व्हायचे त्याप्रमाणे आता धोनी म्हटलं की संघ जिंकणार हे समीकरणच होऊन बसले आहे. ९० च्या दशकात भारतीय संघ म्हणजे सचिन तेंडुलकर अशीच ओळख होती. काही फ्लूक वगळता आपली जिंकायची फारशी तयारी नसायची. आपण जिंकू शकतो हा विश्वास आपल्या संघात आणला तो सौरव गांगुलीने. २००० ते २००५ या वर्षांत गांगुलीने एका चांगल्या संघाची पायाभरणी केली. झहीर, युवराज, हरभजन हे त्याच्याच काळात उदयास आले. आज हेच खेळाडू आपल्या संघाचा अविभाज्य घटक होऊन बसले आहेत. आपण जिंकू शकतो हा विश्वास जसा गांगुलीने निर्माण केला तसा आपण हरणार नाही हा विश्वास धोनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण करत आहे. त्याला सर्वोत्तम कर्णधार वगैरे म्हणणे थोडे घाईचे ठरेल, त्याला तेवढा वेळ आपण दिला पाहिजे तसेच ३ वर्षात धोनीने केवळ विजयाची चव चाखली आहे, अजून अपयश त्याने पाहिले नाहीये.
२००७ चा इंग्लंड दौरा संपता संपता द्रविडने कर्णधारपद सोडले आणि भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला - आयसीसी वर्ल्ड टी२० साठी. कप्तान म्हणून धोनीची ही पहिलीच परीक्षा होती. संघ पण तरुण, अननुभवी होता. साहजिकच भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हणून कोणी गृहीत धरले नव्हते. ही स्पर्धा जिंकून धोनीने आपल्या कप्तानपदाचा श्रीगणेशा केला. आता जेंव्हा एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधार निवडायची वेळ आली तेंव्हा साहजिकच धोनीचं नाव सगळ्यात पुढे होतं, सचिनला कप्तान करा असा देखील सूर निघाला पण खुद्द सचिनने सांगितले की आता ही धुरा तरुण खेळाडूकडे सोपवा.
धोनी एकदिवसीय संघाचा कर्णधार : पहिली स्पर्धा ऑस्ट्रेलिया मधील तिरंगी स्पर्धा. ही ऑस्ट्रेलियामध्ये होणारी शेवटची तिरंगी स्पर्धा होती . भारताने पहिल्या दोन्ही अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला लीलया पराभूत केले आणि प्रथमच ही स्पर्धा जिंकली. कसोटी संघाचा कर्णधार अनिल कुंबळे निवृत्तीकडे झुकलेला असल्याने धोनी आता कसोटी कर्णधार होणे ही केवळ औपचारिकता राहिली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्याकडे आला तेंव्हा ती पूर्ण झाली. कुंबळे आणि गांगुलीने निवृत्ती जाहीर केली आणि कर्णधार म्हणून धोनीची 'कसोटी' सुरु झाली. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन कसोटी जिंकून देऊन बोर्डर-गावस्कर चषक भारतातून परत जाणार नाही याची दक्षता घेतली. त्यानंतर सुरु झाली विजयाची घोडदौड - आशिया कप, श्रीलंका, इंग्लंड यांचे भारत दौरे, आपला न्यूझीलंड दौरा, सगळीकडे आपण विजय मिळवले. धोनीने पहिल्या ११ कसोटी सामन्यात एकही पराभव स्वीकारला नव्हता आणि आत्तापर्यंत त्याने केवळ २ कसोटी सामने गमावले आहेत (कर्णधार म्हणून). गेल्या वर्षी आपण कसोटीमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि ते स्थान अजूनही अबाधित आहे. नुकताच ऑस्ट्रेलियाला व्हाईट-वॉश देऊन आपण ऐन ऍशेसच्या तोंडावर त्यांना पराभवाची चव चाखायला लावली. आज एकदिवसीय मालिका पण खिशात टाकून आपण कांगारूंना हात हलवत मायदेशी पाठवले (सुनील गावस्कर म्हणतात की गेल्या संपूर्ण शतकात कांगारूंना असे कोणी परत पाठवलेले त्यांना आठवत नाही!!!) कप्तान म्हणून धोनीने अजून तरी एक पण कसोटी मालिका गमावलेली नाहीये पण आता खरा कस लागणार आहे तो दक्षिण आफ्रिकेमध्ये. कॅप्टन कूल अशी बिरुदावली मिरवणारा धोनी मैदानात नेहमीच शांत असतो, कितीही बिकट परिस्थिती असेल किंवा कितीही चांगली परिस्थिती असेल तरी धोनीच्या चेहऱ्यावरचे चित्र बदलत नाही :) सहकाऱ्यांवर तो कधी आगपाखड करताना दिसत नाही (अजून पण गांगुली, कुंबळे एखाद्या खेळाडूकडून फिल्डिंग मध्ये चूक झाली की वैतागतात, खरं तर त्या दोघांनाही तो नैतिक अधिकार नाहीये!!! असो ... )
नेहमी दिसणारे चेहऱ्यावरचे 'कूल' भाव
कर्णधाराच्या कामगिरीने सगळ्यांना आदर्श घालून दिला पाहिजे. कर्णधारपदाचा बोजा सहन न होऊन त्याचा वैयक्तिक कामगिरीवर परिणाम झाल्याचे आपण अनेक खेळाडूंच्या बाबतीत पहिले. खुद्द सचिन तेंडुलकरला देखील अपयशाचा सामना करावा लागला. अजून तरी धोनीच्या खेळातून असे जाणवले नाहीये. (याचे एक उदाहरण आयपीएल विषयी बोलताना पाहू) आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत गेले वर्षभर तो अव्वल स्थानावर टिकून होता . यष्टीरक्षक म्हणून त्याला मैदावर सगळ्यात फीट असावे लागते. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट मध्ये (टी२०, एकदिवसीय, कसोटी) यष्टीरक्षकाचे काम सोपे नसते. प्रत्येक चेडूवर एकाग्रता अबाधित राखणे आवश्यक असते तसेच सारखी उठ-बस करावी लागते.

यष्टिरक्षण - अजून एक आव्हान
परिपक्वता
आपण एका राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करत आहोत याची जाणीव धोनीला असल्याचे नेहमी जाणवते. वादग्रस्त विधाने करणे किंवा मॅच रेफ्रीची नजर राहील असे काही करणे धोनी कटाक्षाने टाळताना दिसतो. खिलाडूवृत्तीने पराभव (कधी झालाच तर !!!!) स्वीकारताना तसेच त्यातून झालेल्या चुकांमधून बोध घेताना तो आपल्याला दिसतो. युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेला संघ पुढे घेऊन जाणे इतके सोपे नाहीये पण अजून तरी धोनीचे कोणाशी खटके उडाल्याचे ऐकीवात नाही. सर्व संघ-सहकाऱ्यांशी त्याचा मैदानावर तसेच मैदानाबाहेर चांगला संवाद असल्याचे जाणवते. ड्रेसिंग रूममधल्या गोष्टी मिडियाच्या हाताला लागणार नाही याची पुरेपूर काळजी धोनी घेत असल्याचे दिसून येते. कॅप्टन कूल प्रमाणेच सध्या आपल्याला कोच कूल गॅरी कर्स्टन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गुरु गॅरी आणि धोनी यांची चांगलीच भट्टी जमलेली दिसत आहे.

आयपीएल
२००७ मध्ये विश्वविजेते झाल्यावर आपल्या देशात टी२० ची लोकप्रियता चांगलीच वाढली, त्याला कॅश करण्यासाठी सुरु झाली एक नवीन स्पर्धा - आयपीएल. पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये धोनीला सर्वाधिक किंमत देऊन चेन्नई सुपर किंग्सने विकत घेतले आणि साहजिकच अजून एका संघाची धुरा धोनीच्या खांद्यावर आली. त्याच्या मिडास स्पर्शाची चुणूक इथे पण दिसून आली आणि देशी-परदेशी खेळाडूंना हाताशी धरून त्याच्या संघाने अंतिम फेरी गाठली. शेन वॉर्नच्या संघाने बाजी मारल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याची कसर चेन्नई संघाने या वर्षी भरून काढली - "सर्वोत्तम कर्णधाराकडून सर्वोत्तम खेळाडू पराभूत" असे अंतिम सामन्याचे वर्णन केले गेले. आयपीएल जिंकल्यावर आता जगात सर्वोत्तम असल्याचे दाखवून देण्याची एक संधी आली आणि ती म्हणजे चॅम्पियन्स लीग. गेल्या वर्षी आयपीएलचे सर्व संघ साखळी सामन्यातच पराभूत झाले त्यामुळे आयपीएल मधील खेळाच्या दर्जाविषयी प्रश्न निर्माण झाले होते. यंदा शेवटच्या दोन्ही सामन्यात लीलया विजय मिळवून धोनीच्या चेन्नई संघाने आपण चॅम्पियनोंके चॅम्पियन असल्याचे सिध्द केले. एक सामना लक्षात राहिला तो म्हणजे पंजाब आणि चेन्नई मधला. आयपीएलची उपांत्य फेरी गाठण्यासाठी चेन्नई संघाला सामना जिंकणे अनिवार्य होते आणि शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती, धोनीने इरफानला २ वेळा मैदानाच्या बाहेर भिरकावले आणि सामना एकहाती जिंकून दिला.(धोनी २९ चेंडूत नाबाद ५०) तिथेच चेन्नईची विजयी घोडदौड सुरु झाली. मग आयपीएल आणि नंतर चॅम्पियन्स लीग. परंतु आता पुढील आयपीएलसाठी नव्याने लिलाव होणार असल्यामुळे हे खेळाडू परत एकत्र पाहायला मिळणे कठीण आहे. पुन्हा नव्याने संघ उभा करण्याचे अजून एक आव्हान धोनीसमोर असेल .
येत्या वर्षात आपल्या संघासमोर दोन खडतर आव्हाने आहेत - एक म्हणजे दक्षिण आफ्रिका दौरा आणि त्यानंतर उपखंडात होणारी विश्वकरंडक स्पर्धा. या दोन्ही दौऱ्यांमध्ये धोनीची कसोटी लागणार यात काही शंका नाही. विश्वकरंडक जिंकून धोनी स्वतःला सर्वश्रेठ सिध्द करणार का ? (आणि आपला संघ सचिनला मौल्यवान भेट देणार का!!) हे आता पहायचे. आगामी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी त्याला शुभेच्छा.
जय हो !!!
~अमेय